'विराट' विजयानंतर काय म्हणाला कोहली

मोहीलीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

Updated: Mar 27, 2016, 11:40 PM IST
'विराट' विजयानंतर काय म्हणाला कोहली title=

मोहाली: मोहीलीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. 

या मॅचमध्ये विराट कोहलीनं 51 बॉलमध्ये 82 रनची खेळी केली. विराटच्या या शानदार खेळीमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. 

या अफलातून खेळीमुळे विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात आलं. ही खेळी म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली टॉप 3 पैकी एक खेळी असल्याची प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.