योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक?

भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तसाठी आनंदाची बातमी आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते. मात्र याच लढतीसाठी त्याला आता रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 30, 2016, 11:06 AM IST
योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक? title=

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तसाठी आनंदाची बातमी आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते. मात्र याच लढतीसाठी त्याला आता रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे. 

लंडन ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या कुस्तीपटूने रौप्यपदक मिळवले होते. मात्र या कुस्तीपटूची डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे पदक योगेश्वरला दिले जाऊ शकते. 

2012मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरला कांस्यपदक तर रशियाच्या बेसिक कुदुखोव्हला रौप्यपदक मिळाले होते. बेसिक 2013मध्ये रशियात कार अपघातात मृत्यूमुखी पडला होता. 

रिओ ऑलिम्पिकच्या आधीच्या लंडन ऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या सॅम्पलची आयओसीकडून पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. हे सॅम्पल 10 वर्षांपर्यंत ठेवले जातात. 

या तपासणीदरम्यान बेसिक दोषी आढळल्याने त्याचे पदक योगेश्वरला देण्यात येण्याची शक्यता आहे.