www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लग्झरी कार बनाणारी जर्मन कंपनी मर्सिडिज-बेंझनं आपली एस क्लासमध्ये एक नवीन कार बाजारात आणली आहे. या कारची दिल्ली शोरुममध्ये १.५७ कोटी रुपये इतकी (एक्स शो रुम) किंमत आहे. लोकल टॅक्स लावल्यानंतर ही कार ऑनरोड पावणे दोन कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कमेची होते.
भारतात मर्सिडीज- बेंझचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अबहार्ड कॅर्न यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या कारला आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च केल्यावर ३ महिन्यानंतर ही कार भारतात लॉन्च करण्यात येत आहे. मर्सिडिज-बेंझ कंपनी या कारला पूर्णपणे इम्पोर्ट करणार आहे.
मात्र या कारच्या यशानंतर ही कार भारतातच असेम्बल करण्यात येईल. कॅर्न पुढे म्हटले की, कंपनीने आतापर्यंत या नवीन १२५ कार विकल्या आहे. तसेच लोकल असेम्बल करण्यात येणाऱ्या कारमध्ये अॅडवांस बुकिंग करण्यात येत आहे.
या कारची डिलिव्हरी एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. एस-क्लासच्या या नवीन कारमध्ये ४.६ लीटरचे व्ही इंजीन लावण्यात आले आहे. ही कार सर्वोत्तम ताशी २५० किलोमीटर वेगाने धावते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.