संमसंग गॅलक्सी 'फोरजी'मध्ये...

मोबाईल निर्माता कंपनी 'सॅमसंग'नं फोर जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला नवा स्वस्त हॅण्डसेट लॉन्च केलाय. 

Updated: Jun 9, 2015, 05:57 PM IST
संमसंग गॅलक्सी 'फोरजी'मध्ये...   title=

नवी दिल्ली : मोबाईल निर्माता कंपनी 'सॅमसंग'नं फोर जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला नवा स्वस्त हॅण्डसेट लॉन्च केलाय. 

कंपनीनं 'सॅमसंग गॅलक्सी कोअर प्राईम फोरजी' नावानं हा मोबाईल बाजारात उतरवला आहे. हा पूर्वीपासून बाजारात उपलब्ध असलेला थ्रीजी मोबाईल फोर जी वरही काम करणार आहे. सॅमसंगनं हा मोबाईल कंपनीच्या वेबसाईटवर 9999 रूपयांना उपलब्ध करून दिलाय. 

या स्मार्टफोनसोबत कंपनीनं बऱ्याच ऑफरही ठेवल्या आहेत. हा मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांना एअरटेल कंपनीचा ३ जीबी 'फोरजी डेटा' मोफत दिला जातोय.

'सॅमसंग गॅलक्सी कोअर प्राईम फोरजी'चे वैशिष्ट्यं... 

  • डिस्प्ले - 4.5 इंच डब्ल्यूव्हीजीए

  • ड्यूअल सिम

  • 1.2 गीगाहर्टझ क्वाडकोअर प्रोसेसर

  • 1 जीबी रॅम

  • 8 जीबी इंटरनल मेमरी

  • 64 जीबी मेमरी कार्ड सपोर्ट

  • अॅन्ड्रॉईड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम

  • 5 मेगापिक्सल कॅमेरा

  • 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

  • 2000 एमएएच बॅटरी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.