मुरूडमध्ये समुद्रात बुडणा-या ८ खलाशांना वाचवण्यात यश

मुरूड किना-याजवळ समुद्रात बुडणा-या जहाजावरुन 8 खलाशांना वाचवण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश मिळालंय. 

Updated: Dec 26, 2015, 02:12 PM IST
 मुरूडमध्ये समुद्रात बुडणा-या ८ खलाशांना वाचवण्यात यश title=

मुरुड : मुरूड किना-याजवळ समुद्रात बुडणा-या जहाजावरुन 8 खलाशांना वाचवण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश मिळालंय. काल संध्याकाळी ही घटना घडली. बचावलेले सर्व खलाशी हे गुजरातमधील आहेत. 

एसएसव्ही सरोजिनी हे जहाज शुक्रवारी संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरमधून केरळच्या बेयपोर इथं ४३० टन सोड्याची पावडर घेऊन जात होते. त्यावर गुजरातचे आठ खलाशी होते. मात्र मुरुडपासून १२ नॉटिकल मैल अंतरावर या जहाजाच्या इंजिनरुमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली.

या खलाशांनी तात्काळ कोस्टगार्डकडे मदत मागितली. कोस्टगार्डनंत तातडीनं बचाव मोहीम सुरु करुन सव्वा तीन तासांनंतर आठही खलाशांची सुखरुप सुटका केली. या सर्व खलाशांना मुंबईत आणण्यात आलंय.