रत्नागिरी : पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकण रेल्वेच्या मार्गाची सुरक्षा पाहाणी केली जाते. यावर्षीही हा मार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र या चाचणीनंतरही मार्ग सुरक्षित असल्याचा दावा करताना कोकण रेल्वेने कोकणाची निर्सगाची साथ मिळावी, अशी अशा व्यक्त केलीय.
आपल्या 378 किलोमीटरच्या मार्गात तब्बल 49 मोठे तर 773 छोटे पुल आणि अनेक बोगदे पार करत कोकणच्या डोंगर द-यांतून धावणारी कोकण रेल्वे. या मार्गावरील तब्बल 54 टक्क मार्ग हा बोगदे आणि मातीच्या उंच कटिंगमधून जातो. या विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळेच कोकण रेल्वे समोर वर्षानुवर्ष समस्यांचे अनेक डोंगर उभे राहिलेत.. गेल्या काही वर्षात रत्नागिरी नजीकचा पोमेंडी आणि निवसरचा परिसर कोकण रेल्वेसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरला. मात्र या समस्यांवर मात करण्यात यश आल्याचा दावा कोकण रेल्वे करतेय.
पोमेंडीमध्ये मार्गावर येणारा अख्खा डोंगर कापून काढत. कोकण रेल्वेने तब्बल सा़डेतीन लाख क्युबिक मीटर माती अन्यत्र हलवली... तर निवसरमध्ये खचणारा मार्गाला पर्यायी मार्ग काढत कोकण रेल्वेने इथल्या समस्येवर मात केल्याचा दावा केलाय.याच बरोबर मान्सून करिता संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर चौवीस तास मानवी गस्त घातली जातेय. याकरिता या संपूर्ण मार्गावर 500 पेक्षा जास्त माणसं तैनात केली गेली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.