बजेट २०१७-१८ मध्ये होणार स्वस्त या १७ गोष्टी

 केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते.  पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.  प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त आपण नजर टाकूया काय झाले स्वस्त 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 1, 2017, 04:09 PM IST
 बजेट २०१७-१८ मध्ये  होणार स्वस्त या १७ गोष्टी  title=

मुंबई :  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते.  पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.  प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त आपण नजर टाकूया काय झाले स्वस्त 

या गोष्टी झाल्या स्वस्त 

१) पवन चक्की, 
२) आर ओ, 
३) पीओएस, 
४) पार्सल, 
५) लेदर सामान, 
६) सोलर पॅनल, 
७) नैसर्गिक गॅस, 
८) निकेल, 
९) बायोगॅस, 
१०) नायलॉन, 
११) रेल्वे तिकीट खरेदी करणे, 
१२) स्वस्त घर देण्याचा प्रयत्न, 
१३) मध्य वर्गाला टॅक्स सूट, 
१४) भूमी अधिग्रहणचा नुकसानभरपाई टॅक्स मुक्त 

१५ ) छोट्या कंपन्यांना टॅक्स सूट, ५० कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांचा टॅक्स ३० टक्क्यावरून २५ टक्के कर 
२ कोटी टर्न ओव्हरच्या कंपन्यांना ६ टक्के टॅक्स लागणार यापूर्वी ८ टक्के टॅक्स लाग होता. 

१६) इनकम टॅक्स सूट मर्यादा वाढवली. 
३ लाखांपर्यंत टॅक्स नाही. 
३ लाख ते ५ लाख वर ५ टक्के टॅक्स लागणार 
५ ते १० लाखांवर २० टक्के टॅक्स लागणार
१० लाखांवर ३० टक्के टॅक्स लागणार 

१६) स्टार्ट अप साठी टॅक्स सवलत सात वर्षांसाठी देण्यात आली. 
१७) सौर उर्जा बॅटरी आणि पॅनलच्या टॅम्पर्ट ग्लासच्या सीमा शुल्कात सूट