महिलेला पाहिल्यानंतर अस्वलाची अनपेक्षित प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल

अस्वल... हा प्राणी जंगलात राहणारा... रानटीच... आणि जंगलात राहणाऱ्या अस्वलाकडून मैत्रिपूर्ण व्यवहाराची अपेक्षा न करणंच बरं... 

Updated: Jul 19, 2016, 07:58 PM IST
महिलेला पाहिल्यानंतर अस्वलाची अनपेक्षित प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : अस्वल... हा प्राणी जंगलात राहणारा... रानटीच... आणि जंगलात राहणाऱ्या अस्वलाकडून मैत्रिपूर्ण व्यवहाराची अपेक्षा न करणंच बरं... 

पण, वॉशिंग्टनच्या ऑलिम्पिंक गेम फार्ममध्ये राहणारा एक कोडिएक अस्वल मात्र चर्चेचा विषय ठरलाय. कारण, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. 

जंगल सफर करणाऱ्या एका महिलेनं या अस्वलाला पाहून गाडीतूनच त्याच्याकडे पाहून हात हलवला... त्यानंतर या अस्वलानं दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती... मग, वाट कसली पाहताय... पाहा त्याची प्रतिक्रिया काय होती.