मुंबई : तैवानची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी एसर आपला नवीन लॅपटॉप लाँच करणार आहे. क्रोमबूक १४ असं नाव असणारा हा लॅपटॉप १४ तास चार्जिंग केल्याशिवाय चालू शकेल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
सामान्यपणे बाजारात उपलब्ध असलेले लॅपटॉप २-३ तास चार्जिंग शिवाय चालू शकतात, इतकी त्यांच्या बॅटरीजची क्षमता असते. मात्र, जर का हा लॅपटॉप १४ तास चालणार असेल तर हे क्रांतिकारी पाऊल म्हणावं लागेल.
याच्या बेसिक मॉडेलची किंमत साधारणतः २०,००० रुपये असेल अशी माहिती मिळत आहे. यात इंटेल सेलरॉनचा ड्युअर कोअर प्रोसेसर आहे ज्याचा स्पीड १.६ GHz इतका आहे. ४ जीबी रॅमसोबतच ३२ जीबी इंटरनल स्टोरेज यात देण्यात आले आहे.
लॅपटॉपचे दोन प्रकार
यातील पहिल्या प्रकारात २ जीबी रॅमसोबत १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये म्हणजे ४ जीबी रॅम असणाऱ्या मॉडेलमध्ये १४ इंचाची स्क्रीन असून त्यात फुल एचडी रेझोल्युशनची स्क्रीन आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार ४ जीबी रॅम असणारा लॅपटॉप १२ तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. तर २ जीबी रॅम असणारा लॅपटॉप १४ तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकेल.
२ जीबी रॅमच्या मॉडेलची किंमत अद्यापतरी सांगण्यात आलेली नाही. तसेच हे लॅपटॉप भारतात कधी लाँच होतील हे सुद्धा सांगण्यात आलेले नाही.