...या घोषणेमुळे 'एअरसेल' च्या ग्राहकांना धक्का बसणार

'एअरसेल' या मोबाईल सुविधा पुरविणाऱ्या उपभोक्त्यांसाठी ही एक खुशखबर आहे... 

Updated: Feb 26, 2015, 06:25 PM IST
...या घोषणेमुळे 'एअरसेल' च्या ग्राहकांना धक्का बसणार title=

नवी दिल्ली : 'एअरसेल' या मोबाईल सुविधा पुरविणाऱ्या उपभोक्त्यांसाठी ही एक खुशखबर आहे... 

'एअरसेल'नं  आपल्या उपभोक्त्यांना आनंदाचा धक्का देण्याचं पक्क केलंय असं दिसतंय. कंपनीच्या ग्राहकांना केवळ १७ रुपयांत अनलिमिटेड फ्री कॉलची सुविधा मिळणार आहे.

नव्या ग्राहकांना या सुविधेचा अवधी ३० दिवसांचा असेल तर नियमित ग्राहकांसाठी हा अवधी ३ ते ३० दिवसांपर्यंत असेल. 

एअरसेलच्या पश्चिम क्षेत्राचे व्यवस्थापक हरीश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलिमिटेड फ्री कॉलिंगच्या सुविधेशिवाय कंपनीनं आणखीन एक विशेष पॅकही लॉन्च केलंय. यामध्ये, ग्राहकांना २५ पैसे प्रति मिनिट एसटीडी सेवेचा लाभ मिळू शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.