लग्नाच्या दिवशी तिचे प्राधान्य मातृत्वाला

अनेकदा लग्नात असे क्षण घडतात जे आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात. ३० वर्षीय क्रिस्टिना बेंटोनच्या लग्नातही असेच काहीसे घडले.

Updated: Jul 1, 2016, 04:01 PM IST
लग्नाच्या दिवशी तिचे प्राधान्य मातृत्वाला title=

नवी दिल्ली : अनेकदा लग्नात असे क्षण घडतात जे आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात. ३० वर्षीय क्रिस्टिना बेंटोनच्या लग्नातही असेच काहीसे घडले.

लग्नाची घटिका समीप आली होती. मात्र त्याचवेळी तिची तान्ही मुलगी रडायला लागली. मातृत्व जागे झाले तिने मुलीला उचलून घेतले आणि तिला दूध पाजले. तिच्या या कृतीने सर्वच अवाक झाले.

हा क्षण लाना निमोन्स यांनी कॅमेऱ्यात टिपला. तिचा हा फोटो फेसबुकवर चांगलाच व्हायरल झाला. तब्बल ८ हजाराहून अधिक लाईक्स मिळालेत.