नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’ने दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर देऊ केल्या आहे. त्यापैकी एक ऑफर म्हणजे कंपनीने व्हिडिओ कॉल्सचे दर हे व्हॉइस कॉलच्या बरोबरीने केले आहे. त्याचबरोबर टॉप अप रिचार्जवर फुल टॉक टाइम देण्याचा प्रयत्न करत आहे.
कंपनीने व्हिडिओ कॉलची ऑफर 20 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. फक्त 90 दिवसांकरिता या सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
उत्सवाचे दिवस लक्षात घेऊन बीएसएनएलने मोबाइलच्या व्हॉइस कॉलच्या दराप्रमाणे व्हिडिओ कॉलचे दर कमी केल्यामुळे ग्राहकांना याचा आनंद घेता येईल, असे बीएसएनएलचे बोर्ड निर्देशक (सीएम) अनुपम श्रीवास्तवने सांगितले आहे. या प्लानमध्ये फक्त व्हिडिओ कॉलचे दर कमी केल्याचं कंपनीने सांगितले आहे.
या व्यतिरिक्त कंपनीने100, 150, 250, 350 रुपयांच्या टॉपअप रिचार्जवर फुल टॉक टाइमवर देखील ऑफर दिलीय. त्याचबरोबर 550 रुपयांच्या रिचार्जवर कंपनीने 575 रुपये आणि 750 रुपयांच्या रिचार्जवर 790 रुपयांचा टॉक टाइम देणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.