मुंबई : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत.
बारावीचे विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच cbse.nic.in वर पाहू शकतील. याशिवाय results.nic.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवरही हे निकाल दिसू शकतील.
सीबीएसईननं मार्च-एप्रिल दरम्यान परिक्षेचं आयोजन केलं होतं. देशभरातून तब्बल १० लाख ९८ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.८२ टक्के अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.