नवी दिल्ली : व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी कंपनीने नवीन १९९ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. सध्याचा हेल्पलाईन नंबर १११ हा ३१ जुलैपासून बंद होणार आहे.
'टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया' अर्थातच 'ट्राय'ने २ मार्च रोजी कंपनीला हेल्पलाईन नंबर १११ बंद करण्याचे आदेश दिले होते. हा नंबर 'ट्राय'च्या राष्ट्रीय नंबर योजनांच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे ट्रायनं म्हटलं होतं.
ट्रायनं दिलेल्या सुचनेनुसार दूरसंचार विभागाच्या राष्ट्रीय नंबर योजना २००३ नुसार क्रमांक - १११ आणि क्रमांक - ११५ हे कोणत्याही प्रकारच्या सेवांसाठी वापरता येऊ शकत नाही.
यावर, ट्रायने व्होडाफोन कंपनीला १० मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानंतर ही मुदत वाढवून ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती.
यावर, व्होडाफोननं आपला कस्टमर केअर बदलण्याचा निर्णय घेतला. ११ एप्रिल २०१५ पासून आपण नवीन हेल्पलाईन नंबर सुरू केल्याचं व्होडाफोन इंडियानं ट्रायला कळवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.