मुंबई : आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका
1. गुन्ह्यासंबंधित माहिती
गूगलवर जर तुम्ही कोणतीही संशयास्पद गोष्टी शोधल्या तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. सायबर पोलिसांची यावर करडी नजर असते. जर तुम्ही अशा कोणत्याही गुन्ह्याची किंवा गुन्हेगाराची माहिती शोधत असाल तर तुमची अडचण वाढू शकते.
2. तुमच्या आयडेंटीटी संबधित सर्च
गुगलवर तुमच्या सर्च हिस्ट्रीचं संपूर्ण डेटाबेस असतो. जर तुम्ही तुमची आयडेंटीटी गुगलवर सर्च करत असाल तर तुमची माहिती लिक होण्याचा धोका अधिक असतो. कारण तुमच्या आयडेंटीटीनुसार तुम्हाला अॅड पाठवल्या जातात.
3. मेडिकल किंवा ड्रग्स संबधित माहिती
जेव्हा तुम्ही गुगलवर आजार किंवा मेडिसीन संबंधित माहिती सर्च करत असाल तर हा डेटा थर्ड पार्टीला ट्रांसफर केला जातो. या आधारावर तुम्हाला त्याच आजारासंबंधित अॅड दाखवली जाते. यानंतर ही मेडिकल माहिती क्रिमिनल वेबसाइटला देखील शेअर केली जाते.
4. असुरक्षित संबंधित माहिती
गुगलवर जक तुम्ही असुरक्षित संबंधित कोणतीही माहिती शोधत असाल तर त्या संबंधित गोष्टी तुम्हाला तुमच्या साईटच्या बाजुला दिसतील. यावरुन तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणीतरी फॉलो करतंय. त्यामुळे गुगलवर अशा गोष्टी सर्च करण टाळा.
5 . ईमेल आईडी सर्च न करणे
तुमचा पर्सनल ईमेल आयडी गुगलवर सर्च करु नये त्यामुळे तुमचं अकाऊंट हॅक होऊ शकतं. यामुळे तुम्ही कोणत्याही बेकायदेशीर गोष्टीत फसू शकता. त्यामुळे यापासून सावध राहा.