मुंबई : तुम्ही व्हॉट्सअॅप अथवा फेसबुकवर चॅटिंगदरम्यान इमोजीचा वापर अधिक करता का? एका सर्वेक्षणानुसार जे लोक चॅटिंगदरम्यान इमोजीचा वापर अधिक करतात ते सेक्सबाबत अधिक विचार करत असल्याचे आढळले आहे.
ऑनलाईन डेटिंग वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. या सर्वेक्षणाचे नेतृत्व करणारे हेलेन फिशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमोजी यूझर आपल्या टेक्स मेसेजला अधिक खास बनवतात. इमोजी वापरणारे सेक्सबाबत अधिक विचार करतात. तसेच असे लोक मोठ्या प्रमाणात डेटवर जातात.
पाच हजार लोकांचे यामध्ये निरीक्षण करण्यात आले. यात जे लोक दिवसभरात अधिकवेळा सेक्सचा विचार करतात त्यातील ३६ ते ४० टक्के लोक प्रत्येक टेक्स्टमध्ये इमोजी वापरत असल्याचे आढळले. जे लोक सेक्सबाबत अधिक विचार करत नाहीत ते इमोजीचा वापर कमी करतात.
तसेच जे दिवसातून एक वेळा सेक्सबाबत विचार करतात तेही इमोजीचा वापर करतात मात्र प्रत्येक टेक्स्टमध्ये नाही. जे इमोजीचा वापर फार कमी करतात ते महिन्यात एखादवेळा सेक्सबद्दल विचार करत असल्याचे निरीक्षणातून आढळले.