न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेय. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Updated: Apr 21, 2016, 09:26 PM IST

मुबंई : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेय. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज आहे. एकूण १८३ जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. यात मॅकेनिकल - ७५, इलेक्ट्रिकल-३२, इलेक्ट्रोनिक्स-२६, केमिकल-२८, इंस्ट्रुमेंटेशन-१२, इंडस्ट्रीअल आणि फायर सेफ्टी-१० आदी जागा भरण्यात येणार आहे.

तुम्ही ऑनलाईन अर्ज नोंदणी २५ एप्रिलपासून ते १५ मे २०१६ पर्यंत करु शकता. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.ncpilonline.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.

खालील जाहिरात पाहा :