आता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी

आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे.

Updated: Jan 31, 2016, 09:51 PM IST
आता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी title=

मुंबई: आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे. उडासिटी नावाच्या लर्निंग कंपनीबरोबर फ्लिपकार्टनं करार केला आहे. तरुण एँड्रॉईड डेव्हलपरना नोकरी देण्यासाठी फ्लिपकार्टनं ही शक्कल लढवली आहे. 
उडासिटीच्या सगळ्यात चांगल्या नॅनोडिग्री असलेल्या विद्यार्थ्याला नोकरीवर घेण्याची तयारी फ्लिपकार्ट करत आहे. यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूची गरज नाही. 3 ऍंड्रॉईड डेव्हलपर अशाच प्रकारे फ्लिपकार्ट फ्लिपकार्टच्या इंजिनिअरिंग टीममध्ये सहभागी झाले आहेत, आणि बैंगलोरमध्ये काम करत आहेत.

या नव्या पद्धतीमुळे आम्हाला देशातलं टॅलेंट शोधणं सोपं जाईल, आणि अनेक जण दुसऱ्या कंपनीपेक्षा फ्लिपकार्टमध्ये काम करणं पसंद करतील. अशी प्रतिक्रिया फ्लिपकार्टनं दिली आहे. 
भारतामध्ये वाढत चाललेलं ऍंड्रॉईडचं मार्केट लक्षात घेता अनेक कंपन्या हुशार आणि कार्यक्षम अशा तरुणांच्या शोधामध्ये आहेत, आणि त्यासाठी फ्लिपकार्टनं हा अनोखा फंडा वापरला आहे.