बेदम मारहाण केलेल्या तरुणाचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथील काही व्यक्तींनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

Updated: Feb 2, 2016, 10:24 AM IST
बेदम मारहाण केलेल्या तरुणाचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल title=

तिरुअनंतपुरम : केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथील काही व्यक्तींनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्या व्यक्तींनी तरुणास इतक्या निदर्यीपणे मारहाण केली की यात त्या तरुणाचा दुर्देवी अंत झाला. हे सर्व एका व्हिडीओत कैद झाले असून या व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरतोय. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २३ वर्षीय शब्बीर आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरुन जात होता. यावेळी चार जण समोरुन आले आणि त्याला काठीने मारण्यास सुरुवात केली. शब्बीरने तेथून पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही त्या चार व्यक्तींनी मारणे सुरुच ठेवले. शब्बीर जखमेने विव्हळत होता मात्र त्यानंतरही ती माणसे त्याला मारत होती. या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झालाय. 

पाहा व्हिडीओ

 

ഇവന്മാർ ആരായാലും നിയമത്തിന്റെ മുന്പിൽ കൊണ്ടുവരണം പ്ലീസ് ഷെയർ

Posted by തമാശക്ക് തുടങ്ങിയതാണ് on Monday, February 1, 2016