न्यू यॉर्क: वेगवेगळे ई-मेल अकाऊंट उघडून त्यातील मेल चेक करण्याची झंजट आता संपतेय. कारण आता जीमेलच्या नव्या अॅपवर याहू आणि आऊटलूकचे मेल सुद्धा बघता येणार आहे.
जीएमएनेटवर्कच्या एका रिपोर्टनुसार गूगलचं हे नवं अॅप अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध आहे. जी मेलच्या या अॅपद्वारे वापरकर्ता जीमेल शिवाय आपले इतर अकाऊंटचे मेल पण चेक करू शकतील.
सॉफ्टवेअर इंजीनिअर रेगिस डीकैंप्स यांनी सांगितलं की, हे अपग्रेडेड अॅप विद्यार्थी आणि नोकरदार व्यक्तींसाठी जास्त उपयुक्त ठरेल. ज्यांचे एकाहून अधिक ई-मेल अकाऊंट असतात.
डीकैंप्स पुढे म्हणतात, आपल्या जवळ कितीही ई-मेल अकाऊंट असो, अँड्रॉइडवर जीमेलच्या नव्या अॅपवर आपण सर्व ई-मेल अकाईंटच्या मेल मिळवू शकता. एवढंच नाही तर, 'ऑल ई-मेल'चा एक पर्याय आहे. ज्यात कोणत्याही दुसऱ्या अकाऊंटवर गेल्याशिवाय आपण आपल्या सर्व अकाऊंटचे ई-मेल एकाच जागेवर पाहू शकाल.
डीकैंप्सनं सांगितलं, 'याहू, आऊटलूक डॉट कॉम किंवा इतर आयमॅप/पीओपी अकाऊंटचे सर्व ई-मेल, जीमेलच्या खास अॅपमध्ये पाहिले जावू शकतील.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.