मोदी सरकारने ३२ वेबसाईट केल्या बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशभरातील 32 वेबसाईटस् बंद केल्या आहेत. याबाबत युझर्सनी तक्रार केली आहे. त्यांच्या संगणक आणि मोबाईलवर या वेबसाईट्स ओपन होत नाहीत.

Updated: Jan 1, 2015, 12:07 PM IST
मोदी सरकारने ३२ वेबसाईट केल्या बंद title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशभरातील 32 वेबसाईटस् बंद केल्या आहेत. याबाबत युझर्सनी तक्रार केली आहे. त्यांच्या संगणक आणि मोबाईलवर या वेबसाईट्स ओपन होत नाहीत.

बीएसएनएल आणि वोडाफोन यासारख्या इंटरनेट सर्व्हिस प्रोवाईडर्सचे युझर्स यासारख्या वेबसाईट्स अॅक्सेस करू शकत नाहीत. ज्या नेटिझन्सनी Pastebin, Github आणि DailyMotion सारख्या वेबसाईटस् अॅक्सेस करण्याचा प्रयत्न केला, त्यांना एरर येत आहे. 

दरम्यान, या वेबसाईटने 19 डिसेंबरला ट्विटरवरून वेबसाईट ब्लॉक बाबत माहिती दिली. Pastebin ने ट्वीट केलंय, Pastebin.com ला भारतात ब्लॉक केलं आहे. जर तुम्ही भारतात असाल, आणि वेबसाईट अॅक्सेस करू शकत नसाल, तर आम्हाला मेल करा.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.