मुंबई : काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) नुसार इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (ICSE)च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या ६ मे रोजी लागणार आहे.
१० वीची परीक्षा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान ०,घेण्यात आली. या परीक्षेत ८८,२०९ विद्यार्थी आणि ७०,६२६ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी ९८.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर २०१५च्या मे महिन्यात निकाल लागला होता.
ऑफिशियल वेबसाइट careers.cisce.org वर जाऊन रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून निकाल पाहू शकतात.