नवी दिल्ली: जर आपण ऑनलाइन शॉपिंगचे चहेते आहेत तर आपणासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन शॉपिंग करतांना ऑर्डर दिल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं की त्याचं प्रॉडक्ट लवकरात लवकर डिलिव्हर व्हावं.
ग्राहकांची हिच मागणी मान्य करत देशातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग रिटेलर फ्लिपकार्ट लवकरत तीन तासांमध्ये प्रॉडक्टची डिलिव्हरी करण्यासाठी विचार करत आहे.
फ्लिपकार्ट या योजनेबाबत गंभीर असून सध्या याबाबत विचार सुरू आहे ती कोणते प्रॉडक्ट्स आणि कोणत्या शहरांमध्ये या सर्व्हिसची सुरूवात केली जाईल.
एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्ट आगामी सहा तासांमध्ये ही सर्व्हिस लॉन्च करू शकते. फ्लिपकार्टची लॉजिस्टिक युनिट इकार्टचे हेड सुजीत कुमार यांचं म्हणणं आहे की, "आम्हाला या सर्व्हिसचं प्रायसिंग आणि टेक्नॉलॉजी बाबतीत पहिले निर्णय घ्यावा लागेल. तीन तासवाल्या डिलिव्हरीच्या मागणीचं गिफ्ट या मोबाइल चार्जर सारख्या सामानासाठी होऊ शकते.'
सध्या ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रॉडक्टची डिलिव्हरी देतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.