www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय विमान क्षेत्रात नोकऱ्यांचा जणू पूरच येणार आहे. विमान कंपन्यांमध्ये नवे विमान दाखल होणार आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाण विमानचालन क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
विमानक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २०१७पर्यंत जवळपास दुप्पट होवून १.१७ लाख इतकी होण्याची शक्यता आबे. एका अहवालात ही माहिती देण्यात आलीय. नगर विमान सचिव अशोक लवासा यांनी हैदराबादमध्ये वायू संपर्क वाढवणं या नावानं प्रकाशित केलेला फिक्की केपीएमजी अहवालात हे नमुद करण्यात आलंय, "विमान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २०११ला ६२ हजार होती ती वाढून २०१७या आर्थिकवर्षात १ लाख १७ हजार होण्याची शक्यता आहे. यात वैमानिक, चालक दलातील सदस्य, विमानाचे इंजिनिअर आणि तंत्रज्ञ (एमआरओ), ग्राऊंड हँडलिंग कर्मचारी, प्रशासकीय आणि विक्री कर्मचाऱ्यांचा समावेश आहे."
शिवाय या प्रत्यक्ष उद्योगाशिवाय अप्रत्यक्ष रोजगारही सहापट वाढेल, असंही या अहवालात मांडण्यात आलंय. यात सांगण्यात आलंय की आगामी २०१७ या वर्षापर्यंत सर्व विमानतळांवर प्रत्यक्ष रोजगाराची संख्या जवळपास १, ५०,००० असेल आणि डोमॅस्टिक क्षेत्रात आर्थिक वर्ष २०१६-१७ जवळपास १० लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल.
विमान बाजारात सद्य परिस्थितीत भारत जगातील नवव्या स्थानावर आहे. भारतातील विमानांची संख्या जवळपास ४०० आहे. २०२० पर्यंत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचेल, विमानाची संख्या जवळपास १ हजार होण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.