कावास्कीची केएलएक्स११० बाईक लाँच

कावास्की बाईक कंपनीने नवी ऑफ रोड प्ले बाईक लाँच केलीय. तरुण आणि अॅडव्हेंचर प्रेमींसाठी ही नवी केएलएक्स ११० ही बाईक लाँच कऱण्यात आलीये. 

Updated: Dec 25, 2015, 12:30 PM IST
कावास्कीची केएलएक्स११० बाईक लाँच title=

नवी दिल्ली : कावास्की बाईक कंपनीने नवी ऑफ रोड प्ले बाईक लाँच केलीय. तरुण आणि अॅडव्हेंचर प्रेमींसाठी ही नवी केएलएक्स ११० ही बाईक लाँच कऱण्यात आलीये. 

या बाईकची किंमत २.६५ लाख (एक्स शोरुम, दिल्ली) इतकी आहे. केएलएक्स ११० मध्ये ११२ सीसीचे ४स्ट्रोक एअर कूल इंजिन बसवण्यात आलेत. तसेच प्लेबाईक इंजिनला ४स्पी़ड रिटर्न ट्रान्समिशनशी जोडण्यात आलेय. या ट्रान्समिशनमध्ये सेंट्रिफ्युगल क्लचही देण्यात आलाय.

या बाईकच्या सीटची उंचीही कमी ठेवण्यात आलीये. त्याचप्रमाणे लाँग ट्रॅव्हल सस्पेंशन देण्यात आलेय. केएलएक्स ११०मध्ये इलेक्र्ट्रिक स्टार्टसही देण्यात आलाय.या बाईकची इंधन क्षमता ३.८ लीटर असून वजन ७६ किलो इतके आहे.  लाईम ग्रीन रंगात ही बाईक उपलब्ध आहे.