'सेल्फी'ची क्रेझ असेल तर 'एम २'चा पर्याय हजर!

तुम्हाला सेल्फी काढण्याचा भलताच शौक असेल आणि तुम्ही तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यावर फारसे खुश नसाल तर यूएसच्या इनफोकस नावाच्या एका कंपनीनं तुमच्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध करून दिलाय. 

Updated: Mar 11, 2015, 04:37 PM IST
'सेल्फी'ची क्रेझ असेल तर 'एम २'चा पर्याय हजर!  title=

मुंबई : तुम्हाला सेल्फी काढण्याचा भलताच शौक असेल आणि तुम्ही तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यावर फारसे खुश नसाल तर यूएसच्या इनफोकस नावाच्या एका कंपनीनं तुमच्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध करून दिलाय. 

'इनफोकस'चा  ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला 'एम २' हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. 'सेल्फी'चा शौक असणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक खिशाला परवडेबल असा स्वस्त पर्याय आहे. 

इनफोकसच्या 'एम २'ची वैशिष्ट्ये...

  • ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्रॉईड ४.४ किटकॅट

  • स्क्रीन : एलसीडी स्क्रीन ४.२ इंच

  • ड्युएल सिम सपोर्ट

  • बॅटरी : २०१० मेगाहर्टझ

  • प्रोसेसर : १.३ गीगाहर्टझ क्वॉड कोअर मीडियाटेक एमटी ६५८२ प्रोसेसर

  • रॅम : १ जीबी

  • इंटरनल मेमरी : ८ जीबी (मायक्रो एसडीकार्डच्या साहाय्याने ६४ पर्यंत वाढविता येणार)

  • रिअर कॅमेरा : ८ मेगापिक्सल (एलईडी फ्लॅशसहीत)

  • फ्रंट कॅमेरा : ८ मेगापिक्सल (एलईडी फ्लॅशसहीत)

ई कॉमर्स वेबसाईट 'स्नॅपडील'वर हा फोन तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करता येईल. या वेबसाईटवर या फोनची किंमत केवळ ४,९९९ रुपये आहे. 
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.