फेसबूक मेसेंजरच्या युजर्सची संख्या अब्जांमध्ये

सोशल मीडियावर फेसबूक मेसेंजरचे युजर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मेसेंजरच्या मासिक युजर्सची संख्या १.२ अब्ज एवढी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Intern Intern | Updated: Apr 14, 2017, 03:19 PM IST
 फेसबूक मेसेंजरच्या युजर्सची संख्या अब्जांमध्ये title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर फेसबूक मेसेंजरचे युजर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मेसेंजरच्या मासिक युजर्सची संख्या १.२ अब्ज एवढी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

मागील आठ महिन्यात फेसबूक मेसेंजरचे २० कोटी नवीन युजर्स झाले आहेत. अशी माहिती फेसबूक प्रमुख डेविड यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे.

मेसेंजर हे फेसबूकचे मॅसेंजिंग अॅप आहे. फेसबूक अकाउंट असलेला प्रत्येकजण हे अॅप वापरू शकतो. मागील वर्षी जुलैमध्ये फेसबूकने दिलेल्या माहितीनूसार एक अब्ज मेसेंजरचे युजर्स होते. त्यामध्ये आता वाढ होत आहे. तसेच कंपनी सतत या व्हर्जनमध्ये नवीन बदल करत असते.