नवी दिल्ली : गॅजेट प्रेमींना अजून एक खुशखबर आहे ती म्हणजे मोबाईल कंपनी सॅमसंगनी 'गॅलेक्सी टॅब S' सीरिज लॉन्च केलंय. त्यांचे दोन मॉडल १२ जुलैपर्यंत बाजारात येतील. त्यामधला एक मॉडेल ३जी आणि दुसरा ४जी एलटीई असणार आहे.
याआधी पहिलं सॅमसंगनं न्यूयॉर्कमध्ये 'टॅब -इन- टू' कलर्स झालेल्या कार्यक्रमात 'गॅलेक्सी S सीरीज AMOLED'स्क्रीन असलेला टॅबचं लॉन्चिंग केलं होतं.
गॅलेक्सी टॅब s सोबत रिलायन्सची एक ऑफरही ग्राहकांना मिळणार आहे. ज्यात तीन महिन्यांपर्यत फ्री डेटा आणि बिगफ्लिक्समधून १ हजार फिल्मची एक्सिस देखील करता येईल.
सॅमसंगने २०१२मध्येही AMOLED टॅबलेट लॉन्च केले होते. पण त्याची किंमत जास्त असल्यानं त्याची जास्त विक्री झाली नाही. मात्र आता लॉन्च होणारे टॅब पहिल्या पेक्षा जास्त चांगले आहेत ते आयपॅड पेक्षाही बारीक आहेत.
वैशिष्टये :
१. दोन्ही मॉडलमध्ये ५ ऑक्टा प्रोसेसर (१.९ गीगाहार्टज क्वॉर्डकोर + १.३ गीगाहार्टज क्वॉर्डकोर) आहे.
२. यात अॅन्ड्रॉईडचा लेटेस्ट वर्जन किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
३. ३ जीबी रॅम आणि १६ जीबीची इंटरनल मेमरी आहे ज्याने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
४. ८ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि २.१ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आहे.
५. स्क्रिन ८.४ इंच असलेल्या टॅबची किंमत ३७,८०० रुपये आणि १०.५ इंच स्क्रिन असलेल्या टॅबची किंमत ४४,८०० रुपये आहे.
६. दोन्ही टॅब खूप बारीक आणि हलके असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.