खूशखबर ! आता घरबसल्या मिळवा जिओचं सिमकार्ड

घरी बसल्या सीम मिळणार

Updated: Dec 1, 2016, 04:32 PM IST
खूशखबर ! आता घरबसल्या मिळवा जिओचं सिमकार्ड title=

मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी ३ महिन्यानंतर पुन्हा एकदा हॅप्पी न्यू ईयर प्लान जाहीर केला आहे. मार्च 2017 पर्यंत जिओ सेवा मोफत मिळणार आहेत. त्यासोबतच घरी बसल्या सीम मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुकेश अंबानींनी म्हटलं आहे की, आतापर्यंत ज्यांना सिम मिळालं नव्हतं त्यांना आता लवकरच सिम मिळणार आहे. घरी बसल्या तुम्हाला सिम मिळणार आहे.

- जर तुमच्याकडे 4जी फोन आहे तर माय जिओ अॅप डाउनलोड करा.
- ग्राहकांना लवकरच माय जिओ अॅप डाऊनलोड करुन माहिती भरल्यानंतर सिमची होम डिलीवरी सेवा दिली जाणार आहे.
- जिओच्या सिमची लवकरच होम डिलीवरी सुरु होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत डोर टू डोर सिम डिलीवरी होणार आहे.
- तुमच्या घरी सिम पोहोचल्यानंतर ५ मिनिटात ते सुरु होणार आहे.

मुकेश अंबानींनी केलेल्या घोषणा 

- नव्या यूजर्सला ३१ मार्चपर्यंत वॉईस आणि इंटरनेट सर्विस फ्री दिली जाणार आहे.
- जिओने ४ सप्टेंबरपासून नव्या ग्राहकांना देखील फ्री सेवेची घोषणा केली आहे.
- जुन्या ग्राहकांना देखील ३१ मार्च २०१७ पर्यंत फ्री सेवा मिळणार आहे.
- जिओने नंबर पोर्टेबिलिटी सर्विस देखील सुरु केली आहे.