आता ई-आधार कार्डवरही मिळणार सीमकार्ड

आता ई-आधार कार्डवरही सीमकार्ड दिलं जाणार आहे, त्यामुळे आता ई-आधारकार्डधारकांना नवीन मोबाईल सीमकार्ड खरेदी करणे सुलभ होणार आहे. दूरसंचार विभागाने ई-आधार कार्डला ओळख पत्र आणि रहिवासी पुरावा म्हणून गुरुवारी मान्यता दिली.

Updated: Jul 14, 2016, 09:37 PM IST
आता ई-आधार कार्डवरही मिळणार सीमकार्ड title=

नवी दिल्ली : आता ई-आधार कार्डवरही सीमकार्ड दिलं जाणार आहे, त्यामुळे आता ई-आधारकार्डधारकांना नवीन मोबाईल सीमकार्ड खरेदी करणे सुलभ होणार आहे. दूरसंचार विभागाने ई-आधार कार्डला ओळख पत्र आणि रहिवासी पुरावा म्हणून गुरुवारी मान्यता दिली.

दूरसंचार विभागाने मोबाईल सीम विक्री करणाऱ्या कंपन्यांना ई आधारकार्डवर सीमकार्ड देण्याचे आदेश जारी केले आहेत. बनावट कागदपत्रावर सीम खरेदी होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाल्यानंतर मोबाईल कंपन्यांन्या सीमकार्डचे नवीन कनेक्शन देताना कागदपत्रांच्या पूर्ततेवर अधिक भर देताना दिसत आहेत. 

दरम्यान, मोबाईल कंपन्यांकडून सीमकार्ड खरेदी करताना मोबाईल ई-आधार कार्डवर सीमकार्ड दिले जात नव्हते. मात्र, दूरसंचार विभागाने दिलेल्या नव्या आदेशामुळे आधार कार्ड नोंदणी करुन देखील आधार कार्ड प्राप्त झाले नसेल किंवा आधार कार्ड हारवले असेल तर आधार कार्ड नोंदणी क्रमांकाच्या माध्यमातून ई-आधार कार्ड उपलब्ध करुन त्याच्या प्रिंटद्वारे सीमकार्ड खरेदी करणे शक्य होणार आहे.

बनावट किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून सीमकार्डचा वापर टाळण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी कागद पत्राची पूर्तता काटेकोरपणे करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मतदान ओळखपत्र किंवा पक्के आधार कार्ड छायांकित प्रती जमा करुन घेताना मूळ कागदपत्रांची देखील पडताळणी केली जाते.