तरुणांमध्ये वाढतोय डेस्टिनेशन प्रपोजलचा ट्रेंड

तुम्हाला एखादी मुलगी आवडतेय मात्र तिला प्रपोज केल्यानंतर हो म्हणेल की नाही या टेन्शनमध्ये तुम्ही असाल तर ते टेन्शन घेण्याची गरज नाही. नुकताच प्रपोज कऱण्याचा नवा ट्रेंड आलाय. 

Updated: Jan 14, 2017, 10:00 AM IST
तरुणांमध्ये वाढतोय डेस्टिनेशन प्रपोजलचा ट्रेंड title=

मुंबई : तुम्हाला एखादी मुलगी आवडतेय मात्र तिला प्रपोज केल्यानंतर हो म्हणेल की नाही या टेन्शनमध्ये तुम्ही असाल तर ते टेन्शन घेण्याची गरज नाही. नुकताच प्रपोज कऱण्याचा नवा ट्रेंड आलाय. 

तुम्ही सिनेमात पाहिले असेल की हिरो आपल्या हिरोईनसमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. मात्र आता केवळ या सिनेमा स्टाईलने प्रपोज करण्याची पद्धत जुनी होत चाललीये. सध्या डेस्टिनेशन प्रपोजल हा ट्रेंड वाढतोय. म्हणजेच 
आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला तिच्या आवडत्या ठिकाणी नेऊन तेथे तिला प्रपोज करायचे. यामुळे मुलीने होकार देण्याची शक्यताही वाढते.

आपल्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी डेस्टिनेशन मॅरेजप्रमाणे डेस्टिनेशन प्रपोजल हा ट्रेंड लोकप्रिय होतोय. मात्र हे ध्यानात ठेवले पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही प्रपोज करणार असाल ते ठिकाण त्या व्यक्तीला आवडले पाहिजे.