रिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?

4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. 

Updated: Apr 4, 2017, 05:00 PM IST
रिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती? title=

मुंबई : 4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. मुख्य म्हणजे जिओच्या तुलनेत एअरटेल आणि आयडियाचा स्पीड हा निम्म्याहून कमी आहे.

ट्रायनं फ्रेब्रुवारी महिन्यासाठी दिलेल्या आकडेवारीनुसार जिओचा स्पीड १६.४८ एमबीपीएस एवढा आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत जिओचा हा स्पीड कमी आहे. जानेवारीमध्ये जिओचा स्पीड १७.४२ एमबीपीएस एवढा होता. जिओच्या या स्पीडमुळे कोणताही चित्रपट पाच मिनिटांमध्ये डाऊनलोड होऊ शकतो.

जिओनंतर आयडियाचा इंटरनेट स्पीड ८.३३ एमबीपीएस आणि एअरटेलचा स्पीड ७.६६ एमबीपीएस एवढा आहे. जानेवारीच्या तुलनेत आयडिया आणि एअरटेलच्या इंटरनेट स्पीडमध्येही कपात झाली आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये व्होडाफोनचा इंटरनेट स्पीड ५.६६ तर बीएसएनला स्पीड २.०१ एमबीपीएस एवढा आहे.