सॅमसंगचा 'नोट-4' 3 सप्टेंबरला होणार लॉन्च

सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4च्या लॉन्चिंगची तारीख अखेर जाहीर झालीय. येत्या 3 सप्टेंबरला सॅमसंगचा फॅबलेट नोट-4 बर्लिनमध्ये लॉन्च होणार आहे. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 3, 2014, 08:47 PM IST
सॅमसंगचा 'नोट-4'  3 सप्टेंबरला होणार लॉन्च title=

मुंबई: सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4च्या लॉन्चिंगची तारीख अखेर जाहीर झालीय. येत्या 3 सप्टेंबरला सॅमसंगचा फॅबलेट नोट-4 बर्लिनमध्ये लॉन्च होणार आहे. 

सॅमसंगचा नोट-4 आणि अॅपलच्या आयफोन-6 तील स्पर्धेमुळं त्याची लॉन्चिंगची तारीख ठरत नव्हती. 

सॅमसंग गॅलॅक्सी नोट-4मध्ये उत्कृष्ट हार्डवेअर आहे जे की सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस5 पेक्षाही उत्तम आहे. शिवाय त्यात AMOLED 5.7 इंचाचा डिस्प्ले आहे, ते ही मेटल फ्रेममध्ये. नोट-4मध्ये अल्ट्राव्हायोलेट सेंसर आहे जे यूव्ही रेडियेशन मोजू शकतात. 

गॅलॅक्सी नोट-4चे दोन मॉडेल्स सॅमसंग लॉन्च करणार आहे. एक Qualcomm Snapdragon 805 सह आणि दुसरा Exynos 5433 8 Core असलेला. यात अॅन्ड्रॉईड 4.4.3 किटकॅट आणि अॅन्ड्रॉईड 4.5 लॉलीपॉप ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.