मुंबई : आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तसेच आपला स्मार्टफोन आणि मोबाईल पाण्यापासून कसा सुरक्षित राहील, याबाबत काही टीप्स.
आपला मोबाईल पावसात भिजला किंवा पाण्यात पडला तर चिंता लागते. पाण्यामुळे मोबाईल खराब होण्याचा धोका जास्त असतो, यापासून मोबाईलला कसा धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यासाठी या खालील टीप्स.
बॅटरी तात्काळ काढा
फोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी हॅंडसेटबाबत कोणतीह वॉरंटी देत नाहीत. मात्र, पाण्यामुळे किंवा पाणी फोनमध्ये गेले तर काय करायचा असा प्रश्न पडतो. अशावेळी तात्काळ मोबाईलची बॅटरी लगेच काढा. मोबाईलच्या बॅटरीमागे एक पांढरा कागद चिकटविलेला असतो. हा कागद पिंक किंवा लाल होतो. त्यावेळी समजावे फोनला थोडा धोका आहे.
फोन स्वीचऑफ करा
पाण्यात पडला किंवा पाण्याने भिजलेला फोन त्वरीत बंद करा. भिजलेला फोन बंद पडला तर लगेच सुरु करु नका. फोन सुरु केला तर पाण्यामुळे अन्य सर्कीटशी संबंध येतो. त्यामुळे धोका जास्त असतो. तसेच फोनला लावलेला चार्जर, हॅडफोन तात्काळ काढा.
कॉटन कपड्याने फोन पुसा
फोन भिजला असताना त्यातील बॅटरी लगेच बाहेर काढा आणि सुती कपड्याने पुसा. त्यामुळे फोनमधील पाणी खेचण्यास मदत होते.
हवेवर जास्त करुन फोन कोरडा करा
फोन भिजल्यानंतर तो सुखण्यासाठी जास्त तर हवेवर ठेवावा. मात्र, फोन सुकण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करु नका. याचा वापर केला तर फोन डॅमेज होऊ शकतो. फोन फॅनखाली सुखवा. त्याचा फायदा होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.