१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

Updated: May 25, 2017, 07:23 PM IST
१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा title=

मुंबई : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना १९ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एमबी डेटा मिळणार आहे. व्होडाफोनची या ऑफरची व्हॅलिडिटी एका दिवसाची असणार आहे.

याचबरोबर व्होडाफोननं ४९ रुपयांची दुसरी ऑफरही आणली आहे. यामध्ये ग्राहकांना सात दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि २५० एमबी डेटा मिळणार आहे.