मुंबई : चेकचा वापर साधारणपणे सर्वच ठिकाणी केला जातो. चेकवरील रक्कम, सही, नाव तसेच चेक नंबरबाबत सर्वांनाच माहिती असते. मात्र चेकवरील त्या २३ डिजीट नंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ते २३ डिजीट चेकवर का दिलेले असतात...घ्या जाणून
१. चेक नंबर - चेकवर सर्वात खाली दिलेल्या एकूण नंबरर्सपैकी सुरुवातीचे सहा डिजीट म्हणजे चेक नंबर असतो. रेकॉर्ड ठेवण्यासाठी चेक नंबरचा उपयोग होतो.
२. त्यापुढील ९ डिजीट हे एमआयसीआर कोड असतो. म्हणजेच Magnetic Ink Corrector Recognition. या नंबरमुळे चेक कोणत्या बँकेतून जारी झालाय हे समजते. चेक रीडिंग मशीन हा कोड वाचू शकते. यातील पहिले तीन डिजीच हा शहराचा कोड असतो. त्यानंतरचे पुढील तीन डिजीट बँक कोड असतो. प्रत्येक बँकेचा एक युनिक कोड असतो. आणि उरलेले डिजीट हे शाखेचा कोड असतो. प्रत्येक बँकेच्या शाखेचा कोड वेगवेगळा असतो.
३. बँक अकाऊंट नंबर - पुढील सहा डिजीट नंबर हे बँक अकाऊंट नंबर असतात. हा नंबर अनेक चेक बुक्समध्ये असतो. जुन्या चेकमध्ये हा नंबर नसे.
४. ट्रान्झॅक्शन आयडी - अखेरचे दोन डिजीट हे ट्रान्झॅक्शन आयडी असतात.