आयफोन ६ ला टक्कर देण्यासाठी Miनोट, Miनोट प्रो लॉन्च

बीजिंगमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये चायनीज स्मार्टफोन कंपनी श्याओमीनं आज आपल्या फ्लॅगशिप फॅबलेट Miनोट लॉन्च केलाय. कंपनीचे सीईओ ली जून यांनी सांगितलं की, हा फोन अॅपल आयफोन ६ प्लसला टक्कर देईल. टॅबलेटचे दोन मॉडेल लॉन्च केले गेलेत. एक नोट आणि दुसरं नोट प्रो.

Updated: Jan 15, 2015, 08:10 PM IST
आयफोन ६ ला टक्कर देण्यासाठी Miनोट, Miनोट प्रो लॉन्च title=

मुंबई: बीजिंगमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये चायनीज स्मार्टफोन कंपनी श्याओमीनं आज आपल्या फ्लॅगशिप फॅबलेट Miनोट लॉन्च केलाय. कंपनीचे सीईओ ली जून यांनी सांगितलं की, हा फोन अॅपल आयफोन ६ प्लसला टक्कर देईल. टॅबलेटचे दोन मॉडेल लॉन्च केले गेलेत. एक नोट आणि दुसरं नोट प्रो.

Miनोटचा डिस्प्ले ५.७ इंचचा आहे. जो पूर्णपणे एचडी आहे. इतकंच नाही तर त्याचे कॉर्नर राऊंड आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास ३चा वापर केला गेलाय. फक्त ग्लासवरच नाही तर स्मार्टफोनची बॅक बॉडीवर सुद्धा गोरिल्ला ग्लास ३चा वापर केला गेलाय. ज्याला श्याओमीनं ३Dचं नाव दिलंय.

या फोनमध्ये खूप चांगला प्रोसेसर २.५ GHz क्वार्डकोअर स्नॅपड्रॅगन ८०१ दिलं गेलंय. ज्यामुळं आपलं डिव्हाइस खूप फास्ट प्रोसेसिंग देईल. ४ जीबी रॅम आणि १६ जीबीची इंटरनल मेमरी आहे. जी वाढवून ६४ जीबी केली जाईल. या फोनमध्ये दोन सिम स्लॉट आहे आणि हे दोन्ही सिम ४Gला सपोर्ट करेल. 

१३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे ज्यात ऑपप्टिकल इमेज स्टेबलायझेनची सुविधा आहे. याचा फ्रंट कॅमेरा ४ मेगापिक्सेल आहे ज्याची पिक्चर क्वॉलिटी २ पिक्सेल मायक्रॉन आहे, जी खूप चांगली आहे. 

म्युझिक लव्हर्सनासुद्धा हा टॅबलेट खूप पसंतीस उतरेल. Mi4मध्ये हाय-हाय ऑडिओची सुविधा दिलीय. या फ्लॅगशिपमध्ये ३,०००mAhची दमदार बॅटरी आहे. Miनोटची किंमत ३७१ (२२हजार रुपये) डॉलर ठेवली गेलीय.

कंपनीचा दुसरा फोन म्हणजे Mi4 प्रो आतापर्यंत सर्वात शानदार फोन ठरलाय. याचं प्रोसेसर ८१० स्नॅपड्रॅगन ऑक्टॉकोअर प्रोसेसर आहे. ४ जीबी सॅम आणि याचा डिस्प्ले HD पेक्षा चांगला २K आहे.  याची किंमत ५३० डॉलर (जवळपास ३२ हजार रुपये) असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.