कमळ रुतले चिखलात...

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांना अस्वस्थ वाटु लागल्याने तुरुंगातून जयदेव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येडियुरप्पांना काल अटक करण्यात आली होती. काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांची रवानगी बंगलोरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती.

Updated: Oct 16, 2011, 12:00 PM IST

झी 24 तास वेब टीम, बंगलोर 

 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांना अस्वस्थ वाटु लागल्याने तुरुंगातून जयदेव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येडियुरप्पांना काल अटक करण्यात आली होती. काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांची रवानगी बंगलोरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. पण जामीन अर्ज फेटाळल्यानंतर येडियुरप्पा तब्बल चार तास गायब झाले होते. भाजपाच्या दक्षिण विजयाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडिरुप्पांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

 

[caption id="attachment_2435" align="alignleft" width="300" caption="येडीयुरप्पा रूग्णालयात दाखल"][/caption]

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपल्या मुलांना आणि जावयांना सरकारी जमिनींच्या खैरातीचे वाटप केले होते. लोकायुक्त न्यायाधीश संतोष हेगडेंनी बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणी अहवालात ठपका ठेवल्याने अडीच महिन्यांपूर्वी येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पडलं होते.

 

मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होतानाही येडियुरप्पांनी अनेक अटी मान्य करायला भाग पाडून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक केली होती. भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठवणाऱ्या भाजपाला येडियुरप्पांच्या अनेक भानगडींमुळे नामुष्कीला सामोरं जावे लागले आहे.