नोबेल विजेते हरगोबिंद खोराना यांचे निधन

नोबेल पुरस्काराने सन्मानित हरगोबिंद खोराना यांचे अमेरिकेतील कॉनकर्ड मॅसाच्युसेटस इथे निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. हरगोबिंद खोराना यांना मार्शल निरेनबर्ग आणि रॉबर्ट हॉले यांच्या समवेत १९६८ साली वैद्यकीयशास्त्र शाखेतील योगदानासाठी नोबेल सन्मानित करण्यात आलं होतं.

Updated: Nov 12, 2011, 01:49 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

नोबेल पुरस्काराने सन्मानित हरगोबिंद खोराना यांचे अमेरिकेतील कॉनकर्ड मॅसाच्युसेटस इथे निधन झालं.  ते ८९ वर्षांचे होते. हरगोबिंद खोराना यांना मार्शल निरेनबर्ग आणि रॉबर्ट हॉले यांच्या समवेत १९६८ साली वैद्यकीयशास्त्र शाखेतील योगदानासाठी नोबेल सन्मानित करण्यात आलं होतं. शरिरातील न्युक्लिक ऍसिडमधील न्युक्लोटाईडस ज्यात सेलचा जेनेटिक कोड असतो ते सेलमधील प्रोटिन्सचे अभिसरण कशा प्रकारे नियंत्रित करतात यावर खोरांना यांनी संशोधन केलं होतं. कोलंबिया विद्यापीठाने १९६८ सालीच खोराना आणि निरेनबर्ग यांना लॉइझा ग्रॉस हॉरविटझ पुरस्कार प्रदान केला होता.

हरगोबिंद खोराना यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रायपूर गावात ९ नोव्हेंबर १९२२ साली झाला. त्यांनी लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून १९४३ साली बीएससी आणि १९४५ साली एमएससी पूर्ण केलं. खोराना यांना भारत सरकारने फेलोशिप दिल्यानंतर ते इंग्लंडमधील लिवरपूरच्या विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी गेले. खोराना १९७० साली एमआयटीमध्ये जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र शाखेचे आलफ्रेड स्लोन प्रोफेसर म्हणून रुजू झाले.