पेट्रोल दराबाबत ३०जूनच्या बैठकीत निर्णय

महागाईचा आगडोंब पेटलेला असताना सामान्यांना थोडासा दिलासा मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. १जुलैपासून पेट्रोलचे दर चार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ३० जूनला पेट्रोलच्या दराबाबत तेल कंपन्यांची आढावा बैठक होणार असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

Updated: Jun 27, 2012, 11:57 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

महागाईचा आगडोंब पेटलेला असताना सामान्यांना थोडासा दिलासा मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. १ जुलैपासून पेट्रोलचे दर चार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ३० जूनला पेट्रोलच्या दराबाबत तेल कंपन्यांची आढावा बैठक होणार असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवरून थेट ९९ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांच्या पाक्षिक बैठकीत याचा आढावा घेऊन पेट्रोलचे दर कमी करण्यात येतील अशी माहिती सूत्रांक़डून मिळाली आहे.

 

तेल कंपन्यांनी वाढता तोटा लक्षात घेऊन २३  मे रोजी पेट्रोलचे दर तब्बल आठ रुपयांनी वाढवले होते. त्यानंतर केंद्र सरकारनं दबाव टाकल्यानंतर त्यात दोन जूनला दोन रुपयांची कपात करून ग्राहकांना थोडासा दिवासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा चार रुपयांनी जर हे दर कमी झाले तर महागाईनं उच्चांक गाठलेला असताना सामान्यांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे.

 

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="128306"]