www.24taas.com, नवी दिल्ली
उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएनं हमीद अन्सारींच नाव जाहीर केल्यावर भाजपनंही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात सोमवारी एनडीएची बैठक होतेय. त्यानंतर नाव निश्चित करण्यात येईल. लोकपाल बिलावर राज्यसभेत २९ डिसेंबरला झालेल्या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून हमीद अन्सारींच्या कृतीवर भाजप नाराज आहे. त्यामुळं त्यांना आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भाजपच्या गोटातून संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव आणि भाजप खासदार नजमा हेप्तुल्ला यांची नावं घेतली जातायत.
शरद यादव यांचा निवडणूक लढवण्यासाठी होकार मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी आणि कृष्णा बोस यांची नाव सुचवलीत. मात्र आता बॅनर्जी यापेकी एकाला रिंगणात उतरवणार काय त्यावर एनडीएचा निर्णय ठरेल