कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा जामीन अर्ज आज कर्नाटक उच्च न्यायालयाने मंजूर केला. येडियुरप्पा यांना जमीन गैरव्यवहारप्रकरणी १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.
जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले येडियुरप्पा यांना एका प्रकरणात यापूर्वीच जामीन मिळाला होता. आज आणखी दोन प्रकरणात जामीन मिळाल्याने ते आता कारागृहाबाहेर येणार आहेत.
येडियुरप्पा यांचा जामीन अर्ज यापूर्वी आधी लोकायुक्त न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आज सुनावणी होऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात आलं होतं.