रेड्याची 'काम'गिरी, दरमहा १.५० लाख मालकाच्या घरी!

आम्ही जर तुम्हाला सांगितलं की एक रेडा आपल्या मालकाला महिन्याला दीड लाख रुपये कमावून देतो तर तु्म्ही विश्वास ठेवाल का? नाही ना पण हे खरं आहे.

Updated: Mar 1, 2012, 08:25 PM IST

www.24taas.com, कर्नाल

 

 

आम्ही जर तुम्हाला सांगितलं की एक रेडा आपल्या मालकाला महिन्याला दीड लाख रुपये कमावून देतो तर तु्म्ही विश्वास ठेवाल का? नाही ना पण हे खरं आहे. हरियानातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या सुनारिया गावात करमबीर सिंग यांच्या मालकीच्या रेड्याने गेल्या आठ महिन्यात त्यांना १२ लाख रुपये कमावून दिले आहेत. करमबिर सिंग यांच्या मालकीच्या मुरा जातीच्या युवराज नावाचा रेडा महिन्याला दीड लाख रुपये कमावतो. करमबिर सिंग यांनी युवराजचे वीर्य विकून हे पैसे कमावले आहेत.

 

 

कर्नाल इथल्या नॅशनल डेअरी अँड रिसर्च इन्स्टिट्युटने आयोजीत केलेल्या पशु मेळ्यात युवराजला चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळेस युवराजला इनामापोटी २४,००० रुपये मिळाले होते. त्यानंतर हिसार इथल्या मेळ्यात १६,००० रुपयांचे इनाम युवराजने पटकावलं होतं. पण युवराजच वीर्य हा त्याच्या मालकासाठी खरा उत्पन्नाचा स्त्रोत आहे.

 

 

युवराज जवानीत आल्यानंतर त्याला कर्नाल इथल्या वीर्य निमिती केंद्रात त्याला जून २०११ मध्ये दोन महिने ठेवल्याचं करमबीर सिंग म्हणाले. युवराजच्या वीर्याचे ५००० डोस बनवण्यात आले आणि प्रत्येक डोस ३०० रुपयांना विकल्याचं करमबीर सिंग यांनी सांगितलं.

 

 

रेड्याच्या जैविक पार्श्वभूमीचा विचार करुन त्याच्या वीर्याच्या डोसाची किंमत निश्चित करण्यात येते. युवराज आई सरस्वतीने २००९-१० मध्ये २६.४ लिटर दुधाचे उत्पादन करुन पहिला क्रमांक पटकावला होता. हरियानाच्या कर्नालला देशभरातले शेतकरी वीर्याचे डोस विकत घेण्यासाठी येतात असं निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.व्ही.एस.रैना यांनी सांगितलं.

Tags: