बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्या सत्र सुरुच

बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्यांचं सत्र सुरुच आहे. बीड शहरात स्त्री जातीची दोन अर्भकं सापडलीयेत. बार्शीनाका पुलाखाली ही अर्भकं सापडलीयेत. मृत अर्भकांपैकी एक आठ महिन्यांचं तर दुसरं साडेसहा महिन्यांचं अर्भक आहे.

Updated: Jun 2, 2012, 02:26 PM IST

www.24taas.com, बीड

 

बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्यांचं सत्र सुरुच आहे. बीड शहरात स्त्रीची दोन अर्भकं सापडलीयेत. बार्शीनाका पुलाखाली ही अर्भकं सापडलीयेत. मृत अर्भकांपैकी एक आठ महिन्यांचं तर दुसरं साडेसहा महिन्यांचं अर्भक आहे.

 

काही दिवसांपूर्वी परळीतल्या डॉक्टर मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होती. स्त्री भ्रूण हत्येच्या प्रयत्नातूनच तीचा मृत्यू झाला होता. स्त्री भ्रूण हत्यांसाठी कुख्यात असलेला डॉक्टर मुंडे फरार असतानाच बीड मध्ये पुन्हा स्त्री अर्भकं सापडल्यानं पोलीस आणि प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, बीडमधील डॉ. सुदाम मुंडे यांच्या दवाखान्यात केले जाणारे स्त्री गर्भपात प्रकरण गाजत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातल्या भोगावतीमध्ये एका दवाखान्यातही गर्भपात झाल्याचं उघड झालंय. डॉ. प्रभाकर चौगुले यांच्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील एका महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे.

 

परवानगी नसताना गर्भपात केल्यामुळं आता डॉ. चौगुलेंवर आठवड्याभरात कारवाई करण्यात येणाराय. दवाखान्याशेजारी कंपाउंडरच्या घरात सोनोग्राफी मशीन आढळून आले असून ते सील करण्यात आलंय. यानंतर दवाखान्यातील रुग्णांना वा-यावर सोडून डॉ. चौगुले गायब झालाय. गर्भपात केलेल्या महिलेला सध्या कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय. तिच्या पोटात दोन महिन्यांचा गर्भ होता.

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="113309"]