www.24taas.com, पुणे
येत्या तीन-चार दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. रविवारी मान्सूननं जोरदार एंट्री मारली.कोकण विदर्भाप्रमाणे सा-या महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला होता... मात्र मान्सून पुन्हा गायब झाला.
पॅसिफिक समुद्रातील चक्रीवादळ आणि चीनमधल्या तलिम वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याचं पुणे वेधशाळेच्या उपमहासंचालिका मेधा खोले यांनी म्हटलंय.. या वादळाच्या दिशा आणि वेगावर मान्सूनचा पुढचा प्रवास अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलंय.. त्यामुळं सध्या तरी मान्सूनचं जोरदार पुनरागमन होण्याची चिन्हं नसली तरी येत्या 3-4 दिवसांत तो पुन्हा सक्रीय होईल असं खोले यांनी म्हटले आहे.
राज्यात पावसानं शेतक-यांची झोप उडवली आहे. आतापर्यंत केवळ दोन टक्के पेरण्या झाल्यात.... त्यामुळे शेतीवरचं संकट गहीरं झालंय.... 19 जूनपर्यंत 104 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या 74 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यातल्या धरणांमध्ये 13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातल्या बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालाय. राज्यात खरिपाचे 132.34 लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 2.24 लाख हेक्टर म्हणजेच 2 टक्के क्षेत्रावर पेरणी झालीय. भाताची पेरणी सरासरी क्षेत्राच्या 4 टक्के तर कापसाची पेरणी 5 टक्के झालीय. मका, भुईमूग पिकांची पेरणी केवळ 1 टक्का क्षेत्रावर झालीय.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="124830"]