फोन टॅप होत असल्याचा अण्णांचा खळबळजनक आरोप

टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचे खळबळजनक आरोप केलाय.जनलोकपालाच्या मुद्यावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अण्णांना सोशल नेटवर्किंग साईटद्वारे जगभरातल्या तरुणांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं तरुण पिढीशी नाळ जोडण्यासाठी अण्णांना ब्लॉग महत्त्वाचा आहे.

Updated: Nov 6, 2011, 05:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी

 

राजू परुळेकर यांच्याशी वाद झाल्यावर आता अण्णा नव्यानं ब्लॉग लिहणार आहेत. राळेगणसिद्धीत याबाबत अण्णांनी घोषणा केली. तसंच आपले फोन टॅप होत असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. राजू परुळेकर यांच्याशी वाद झाल्यावर आता अण्णांनी नव्यानं ब्लॉग लिहिण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी दोघांची नेमणूक करण्यात येईल. असं अण्णांनी राळेगणमध्ये सांगितलं आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत अण्णांनी राजू परुळेकरांवर अविश्वास दाखवल्यानंतर वाद झाला. परुळेकरांनी जनलोकपाल समितीची पुनर्रचना करण्याबाबतचं अण्णांचं २३ ऑक्टोबर २०११चं पत्र थेट अण्णांच्याच ब्लॉगवर प्रसिद्ध केलं होतं. मी लवकरच  कोअर कमिटीची पुर्नरचना करणार आहे. त्यासाठी टीम अण्णांच्या सर्व सभासदांना कळवत आहे. या आंदोलनात देशभरातून जीवन समर्पित करायला अनेक जण तयार आहेत. त्याबाबत देशभरातून अशी पत्रे आली. परुळेकर यांनी केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. झालेल्या वादानंतर ब्लॉक बंद करण्याची घोषणा केली खरी पण नंतर काही तासातचं नव्यानं ब्लॉग लिहणार असल्याचं जाहीर केलं.

 

अण्णांनी सरकारवर तोफ डागत टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचे खळबळजनक आरोप केलाय.जनलोकपालाच्या मुद्यावर दिल्लीत आंदोलन करणा-या अण्णांना सोशल नेटवर्किंग साईटद्वारे जगभरातल्या तरुणांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं तरुण पिढीशी नाळ जोडण्यासाठी अण्णांना ब्लॉग महत्त्वाचा आहे. त्यामुळं ब्लॉक बंद करण्याचा निर्णय अण्णांनी काही तासातच रद्द केला