मनसेचा टोल हल्ला, भुजबळांवर गुन्हा

पुण्यातल्या शिरूरजवळच्या टोलनाक्यावरील टोल वसुलीविरोधात कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनतर राज्यभर मनसेच्या रडारावर टोल नाके आलेत. ठिकठिकाणी टोल नाक्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

Updated: Jun 13, 2012, 05:48 PM IST

www.25taas.com, पुणे/मुंबई

 

पुण्यातल्या शिरूरजवळच्या टोलनाक्यावरील टोल वसुलीविरोधात कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.

 

शिरूर कोर्टानं तसे आदेश दिले होते. त्यानंतर शिरूर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले. दरम्यान राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनतर राज्यभर मनसेच्या रडारावर टोल नाके आलेत. ठिकठिकाणी टोल नाक्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल टोलविरोधी आंदोलनाच्या घोषणेनंतर मनसैनिकांची राज्यभर टोलधाड सुरु आहे. वाशीतल्या टोलनाक्य़ावरही मनसैनिकांनी तोडफोड केली.

 

पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन ही तोडफोड करण्यात आलीये. यावेळी टोलविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन करणा-या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

मनसेचे टोलविरोधी आंदोलन आजही सुरुच आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई- अहमदाबाद हायवेवरील खानिवडे टोल नाका बंद पाडलाय. शेकडो कार्यकर्ते सकाळच्या सुमारास खानिवडे टोल नाक्यावर दाखल झाले. त्यांनी टोल वसुली बंद केली.

 

विनाटोल वाहनांना त्यांनी सोडलं. यावेळी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर पोचल्यावर तिथल्या कर्मचा-यांनी पळ काढला. तर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनुचित प्रकार घडला नाही. पुणे जिल्ह्यात खेड शिवापूर टोलनाक्यावरही मनसैनिकांनी टोलची तोडफोड केलीय. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरात मनसैनिक संतप्त झाले आहेत.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्याविरोधात दिलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत मनसैनिकांनी नागपुरातही मनसे स्टाईल आंदोलन केलं.. एमआयडीसी नाका आणि हिंगणा नाका मनसैनिकांनी बंद पाडला.. यावेळी हिंगणा नाक्यावर मोठी तोडफोडही करण्यात आली.

 

तोडफोडीनंतर 7 ते 8 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असली, तरी हा गोँधळ सुरु असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली.

 

औरंगाबादमध्येही मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांची तोडफोड सुरू केलीय. औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर हर्सूल सावंगी टोलनाक्याची सुमारे 25 कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

 

टोलनाक्यावर पोलीस असतानाही कार्यकर्त्यांना रोखण्यात ते अपयशी ठरले. तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील ओढा टोलनाक्यावरही मनसैनिकांनी मनसेनं टोलविरोधी आंदोलन केलं. राज्यभर मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाअंतर्गत मनसैनिक या टोलनाक्यावर धडकले.. य़ावेळी कार्यालय फोडून त्यांनी नाका काही काळ बंद पाडला. यावेळी आंदोलन करणा-या 100 ते 150 मनसे कार्यकर्त्यांना अटक केली...

 

मनसे अ