सानिया मिर्झा डबल्स मेडलची दावेदार

सानिया मिर्झाकडूनही भारताला मेडल्सच्या अपेक्षा आहे. लंडनमध्ये ती वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये मेडलची दावेदार आहे.सानियाचा जलवा लंडनमध्ये चालला तर भारताला अजून ऑलिम्पिक मेडलही पक्क होईल.

Updated: Jul 15, 2012, 12:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सानिया मिर्झाकडूनही भारताला मेडल्सच्या अपेक्षा आहे. लंडनमध्ये ती वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये मेडलची दावेदार आहे.सानियाचा जलवा लंडनमध्ये चालला तर भारताला अजून ऑलिम्पिक मेडलही पक्क होईल.

 

जवळपास एक दशक झालं ना सानिया बदललली ना सानियाकडून असलेल्या अपेक्षा कमी झाल्यात. भारताची ही ग्लॅमर डॉल लंडन ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल्सची दावेदार आहे. मिक्स डबल्समध्ये सनिया लिएडर पेसची साथीदार आहे.तर वुमेन्स जबल्समध्ये रुश्मी चक्रवतीसोबत तू खेळणार. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सानिया फारशी चमक दाखवू शकली नसली तरी लंडन ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडूनही भारताला मेडल्सच्या अपेक्षा आहे.

 

तिची तयारीही जबरदस्त आहे. फ्रेंच ओपनमध्ये तिनं मेहश भूपतीसोबत मिक्स डबल्सचं विजेतपदही पटकावलं. सानियाच्या नावावर आतापर्यंत दोन ग्रॅण्ड स्लॅम विजेतपद आहे.तर कॉमनवेल्थ गेम्समध्येही सानियानं एक सिल्व्हर आणि ब्राँझची कमाई केलीय. तर एशियन गेम्समध्ये सानियानं एक गोल्ड , तीन सिल्व्हर आणि एक ब्राँझ मेडल जिंकलंय.

 

लंडन ऑलिम्पिकसाठी सानियाल वाईल्ड कार्डनं एन्ट्री मिळाली असली तरी मेडलसाठी तीची दावेदारी निश्चित मजबूत आहे..टेनिसमधील विवादानंतर आपण कोणासोबतही देशासाठी खेळण्यास तयार असल्याच सानियानं स्पष्ट केलंय. त्यामुळेच टेनिसमधील ब्युटीनं लंडनमध्ये खेळातही आपला जलवा दाखवावाव एवढीच भारतीय फॅन्स अपेक्षा.

 

व्हि़डिओ पाहा..

[jwplayer mediaid="139656"]