www.24taas.com, नवी दिल्ली
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. आंध्र प्रदेशातले वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या कंपनीत श्रीनिवासन यांची २०० कोटी रुपयांची भागीदारी असल्याच्या संशयावरुन त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पुढच्या आठवड्यात त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जगनमोहन सध्या कोठडीत आहेत. जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरच ं सरकार होतं तेव्हा श्रीनिवासन यांच्या कंपनीला फार मोठा नफा झाला होता.
सीबीआयने पेना आणि दालमिया सिमेंट कंपनीच्या एमडींना सुद्धा समन्स पाठविलं आहे. त्यांना जगनमोहन यांच्या कंपनीशी संबंध ठेवल्याबाबत उत्तर द्यावं लागणार आहे.