गिरगावातला गुढीपाडवा

Apr 06, 2019, 09:08 AM IST
1/6

गिरगावातला गुढीपाडवा

मराठी नववर्षाची सुरुवात करणारा गुढीपाडव्याचा सण आज राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्ताने मुंबईच्या गिरगाव परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर मोठ्या रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या.

2/6

गिरगावातला गुढीपाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्याच्या मंगलदिनी मुंबईसह राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये पारंपारिक शोभायात्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.

3/6

गिरगावातला गुढीपाडवा

गिरगावच्या शोभायात्रेत नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर फगवा फेटा अशा पेहरावात महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. 

4/6

गिरगावातला गुढीपाडवा

गिरगावातील शोभायात्रा नेहमीच तरुणाईसाठी आकर्षण ठरल्या आहेत. यंदा पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. 

5/6

गिरगावातला गुढीपाडवा

मुंबईसह राज्यभरात काढण्यात येणाऱ्या अशा शोभायात्रांसाठी तरुणाईची मोठी गर्दी असते. पारंपरिक पोशाख परिधान करून यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. 

6/6

गिरगावातला गुढीपाडवा

गिरगावातील शोभायात्रेत सामील झालेले हे छोटेवीर.